पुणे : देशातील सर्कस उद्योगाला उर्जीत अवस्था यावी यासाठी झटणारे आणि पुण्यातील जगप्रसिद्ध रॅम्बो सर्कसचे संस्थापक पी. टी. दिलीप (वय-74) यांचे काल अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पाश्चात पत्नी, विवाहित मुलगा, सुन, विवाहित मुलगी, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे.उद्या शनिवारी हडपसर येथील सेपल्कर दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती पी. टी. दिलीप यांचे सुपुत्र सुजीत दिलीप यांनी दिली.पी. टी. दिलीप हे मुळचे केरळ येथील आहे. त्यांचे महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील लोके हायस्कूलमध्ये झाले. मोबाईल अॅम्युझमेंटमध्ये ते मॅनेजन म्हणून त्यांनी काम केले. नव्वदच्या दशकात त्यांनी तीन लहान सर्कस एकत्र केल्या. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. 26 जानेवारीच्या मूहुर्तावर त्यांनी रॅम्बो सर्कस उभी केली. या रॅम्बो सर्कसनी संपूर्ण आशियाचा दौरा केला. सर्कसच्या माध्यमातून पुण्याचे नाव जगप्रसिद्ध केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेतर्फे 1992 मध्ये पी. टी. दिलीप यांचा विशेष गौरव करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सर्कसमध्ये प्राण्यांच्या खेळांवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे उताराला लागलेल्या सर्कसला उर्जीत अवस्था यावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न करीत केले.सर्कसला मध्यवर्ती ठिकाणी कमी दरात मैदान मिळावे, यासाठी प्रत्येक शहरामध्ये त्यांनी खुप प्रयत्न केले. तसेच राज्य सरकारनेदेखील सर्कसस उद्योगाला आर्थिक पाठबळ द्यावे, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटात सर्कसला राज्य सरकारकडून मदत मिळावी, म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न करुन मदत मिळवून दिली. त्यांच्या कारर्किदीत त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सर्कस मित्रमंडळ पुणेचे अध्यक्ष प्रविण वाळिंबे, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सरचिटणीस प्रवणि तरवडे, नंदकुमार बानगुडे आणि आनंद धोत्रे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय सर्कसचा आधारस्तंभ हरपला, अशा भावना व्यक्त केल्या.