पुणे-माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. निम्हण हे 1999 ते 2014 अशी 15 वर्षे शिवाजीनगर मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडणून आले होते. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते आणि नंतरचे पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते. आज दुपारी दोनच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
विनायक निम्हण यांच्या पत्नी देखील नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या होत्या.तर मुलगा देखील नगरसेवक म्हणून निवडून आलेला होता , शिवाजीनगर मतदारसंघातून 1999 साली विनायक निम्हण आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनेचे विभागप्रमुख, आमदार, पुणे शहर प्रमुख, अशी त्यांची ओळख होती. दोन वेळा शिवसेनेकडून आणि 2009 साली काँग्रेस पक्षाकडून निम्हण आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 साली त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा हातात घेतला. यावेळी त्यांची शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी निवड करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून माजी आमदार विनायक निम्हण हे परिचित होते. राणे हे शिवसेनेपासून वेगळे झाल्यानंतर त्यांच्यासोबत खंबीरपणे माजी आमदार निम्हण उभे राहिले होते आणि त्यांनी राणे यांना चांगल्या प्रकारे साथ दिली होती.