पुणे -महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हातीच पुन्हा एकदा महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या सोपवल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने रासने यांच्यावर विश्वास दाखवला असून महापालिकेच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा स्थायी समितीचे अध्यक्ष होणारे हेमंत रासने हे पहिले अध्यक्ष ठरले आहेत.
पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीमधील स्थायी समितीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडलीसलग तिसऱ्यांदा स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर हेमंत रासने यांनी सांगितले की, शहराच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्यावर विरोधकांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यामध्ये यश आले नाही. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून सलग तिसऱ्यांदा माझ्याकडे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. महापालिकेच्या इतिहासात अशी संधी केवळ मलाच मिळाली असून ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती विरोधकांना केली होती. मात्र, यात यश आले नाही. परंतु येत्या वर्षात महापालिकेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रासने यांनी सांगितले.