पेट्रोल दरवाढ, गॅस सिलेंडर दरवाढ, बेरोजगारी आदी समस्या वर अर्थमंत्री काहीही बोलत नाहीत आणि सत्ता मिळविण्यासाठी पोलिसी बळावर दौरे करतात : आप चे लक्षवेधी आंदोलन
पुणे : महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणे याचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गाडीचा ताफा अडवला, अशी माहिती आप पक्षाचे प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांनी दिली .देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
भाजपच्या मिशन लोकसभा या कार्यक्रमांतर्गत त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती विजयासाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दौऱ्यावर असताना सीतारामण यांचा ताफा पुणे शहरातील वारजे येथे आपच्या कार्यकर्त्यांकडून अडवण्याचा प्रयत्न केला. राज्य प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी सांगितले कि,;
जीवनावश्यक वस्तूंवरती म्हणजे लस्सी दही औषधे इत्यादी सामान्य माणसाला लागणाऱ्या गोष्टींवर जीएसटी लावल्याच्या आणि महागाईच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना वारजे जवळ काळे झेंडे दाखवत ताफा अडवला.
गेल्या काही वर्षांमध्ये करोना लॉकडाऊन मुळे सामान्य माणसाचं आर्थिक गणित ढासळून गेलेला आहे अशी स्थिती असताना सामान्याच्या खिशाला चाट देणाऱ्या जीएसटी चा निषेध म्हणून पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या अर्थमंत्र्यांना ही जनतेची भावना कळावी यासाठी काळे झेंडे दाखवले असे या कार्यकर्त्यांनी सांगितले. तीन चार दिवसांपूर्वी प्रंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवशी जुन्नर मधील केदारी नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली व मोदींच्या नावे चिट्ठी लिहिली त्या कुटुंबांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी अर्थमंत्री या पन्ना प्रमुखांच्या भेटी घेत निवडणुकीचा अजेंडा पुढे नेत आहेत पेट्रोल दरवाढ, गॅस सिलेंडर दरवाढ, बेरोजगारी आदी समस्या वर अर्थमंत्री काहीही बोलत नाहीत हे गंभीर आहे. देशामध्ये सामान्य माणूस भरडला जातो आहे, परंतु अदानी जगामध्ये नंबर वन कडे वाटचाल करीत आहे. अशा स्थितीत महागाई विरोधात कोणीच बोलत नसताना आपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरणे हे विशेषच आहे. अक्षय शिंदे ,निलेश वांजळे व सतीश यादव या आप च्या कार्यकर्त्यांना स्थानिक वारजे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी तत्काळ आपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अर्थमंत्री सीतारामण यांचा ताफा पुढे जाऊ दिला.यात आपचे वारजे माळवाडी भागातील कार्यकर्ते निलेश वांजळे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. यावेळी महागाई विरोधात, केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात व ऑपरेशन लोटस विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.