पुणे- वाहतूक नियमनाच्या नावाखाली लोकांना अडवून,थांबवून ठेवत कायदे,नियम शिकवीत त्यांच्याकडून दंड वसुली करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी केवळ एवढ्याच कामा यासाठीच चक्क सातारा रस्त्यावरील वाळवेकर लाॅॅन्सला खेटूनच ‘साहेबा’ला बसण्यासाठी ऑफिस थाटले.. ते हि महापालिकेची वा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता..थाटले, हे अतिक्रमण, बेकायदा काम लक्षात येताच राष्ट्रवादीचे नितीन कदम यांनी आवाज उठविला आणि माय मराठी ने तो चव्हाट्यावर मांडला.. हे अतिक्रमण खुद्द कायद्याच्या रक्षणकर्त्यांनी केल्याने यातून जाणाऱ्या गंभीर संदेशाची दखल वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आणि खुद्द पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याने,महापालिकेच्या अतिक्रमण खात्याच्या प्रमुखांनी हि इशारा दिल्याने अखेरीस ज्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने हे अतिक्रमण करविले त्यालाच ते काढून घ्यावे लागले.