पुणे-पुणेकरांच्या नावानं शिमगा करण्यात कोण पुढे नसतं , पण संकटाच्या काळी, वेळप्रसंगी एकत्र आले नाही ते पुणेकर कसले ? एरवी एकमेकांना शालजोडीतून मारणारे .. टोमण्यांनी घायाळ करणाऱ्या पुणेरी पाट्या तशा आमच्या फेमस आहेतच . पण कोरोना च्या विरोधातील लढ्यात त्याही तशा मागे राहिलेल्या नाहीत .कोरोना कोरोना करीत बसण्यापेक्षा कोरोना विरोधात लढा कसा द्यायचा आहे हे सांगण्यात पुणेरी पाट्याही गेल्या ४० दिवसात पुढे आल्याच्या दिसल्या त्यातल्या त्यात या काही पुणेरी पाट्या सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते बाप्पू मानकर यांनी पाठविल्या आहेत जरा त्याही पाहून घ्या .. आणि कोरोना विरोधातला लढा आता संयमित पण यशस्वी करून दाखवा .अन्यथा आम्ही पुणेकर कसले नाही का ?पहा एक झलक ….