पुणे-कोरोना मुळे निर्माण झालेल्या जागतिक आपत्ती मध्ये पुण्या सारख्या शहरालाही मोठा फटका बसला लॉक डाऊन मुळे सर्वांना घराबाहेर येवू नका हे ज्या हक्काने आम्ही सांगत आहोत त्याच हक्काने कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी देखील माझ्या प्रभागात घेतली जाईल .आणि कोरोनाशी लढण्यासाठी आम्ही सारे एक आहोत ,एकीने कोरोनाचा सामना करू हा संदेश देण्यासाठी प्रत्येक गरजूच्या घरी महिनाभराचा किराण माल पोहोचवू अशी घोषणा करत नगरसेवक उमेश गायकवाड यांनी आज महापौर मुरलीधर मोहोळ ,भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक ,माजी मंत्री दिलीप कांबळे, संघटन मंत्री रवि अनासपूरे,आमदार सुनील कांबळे ,सिक्किम विद्यापीठा चे कुलगुरू ले. जर्नल डॉ. डी बी. शेकटकर यांच्या उपस्थितीत या कामाचा आज प्रारंभ केला .५ किलो – गव्हाचे पीठ ३ किलो – तांदूळ,१ किलो पॅकेट – तेल,१ किलो – डाळ, वडी – साबण, अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या अंतर्कगत घरोघरी करण्यात येणार आहे
माझा प्रभाग ,माझी जबाबदारी हे ब्रीद घेऊन गायकवाड यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले.