झोपडपट्ट्यांमध्ये दारोदारी आरोग्य दूत -अरविंद शिंदेंचा प्रयत्न (व्हिडीओ)
पुणे- कोरोनाला रोखण्यासाठी झोपडपट्ट्यांमध्ये दारोदारी आरोग्य दूत पोहोचविण्याच्या प्रयत्नासाठी कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीतून महापालिकेला आणि आपल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पिपिई किट सह इन्फ्रा रेड थर्मामिटर काल उपलब्ध करून दिले
झोपडपट्टी परिसरात कोरोना ने उच्छाद मांडू नये म्हणून महापालिकेच्या आरोग्य पथकांना यातील काही कीट आणि थर्मोमिटर उपलब्ध करून दिले या शिवाय ताडीवाला रोड झोपडपट्टीत असलेलेया ४८ गल्ल्यांमध्ये प्रत्येकी एका कार्यकर्त्यावर जबाबदारी सोपवून त्या गल्लीतली आरोग्यविषयक माहिती या पथकांना रोजच्या रोज कळवावी अशा सूचना दिल्या . या कार्यकर्त्यांना पीपीई कीट देवून प्रथम आरोग्य पथकासोबत पाठविले जाईल आणि नंतर रोजच्या रोज हेच कार्यकर्ते आपल्याकडे देण्यात आलेल्या थर्मो मित्र मार्फत रोज दारोदारी जावून तपासणी करून त्याबाबत चा रिपोर्ट पथकांना व्हाटस एप मार्फत कळवतील अशी संक्ल्प्नां मांडून तिचा प्रारंभ शिंदे यांनी केला आहे. आरोग्य पथक रोज झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून कार्यकर्त्यांची मदत घेवून्त्यांना आरोग्य दूत बनवून कोरोनाला पायबंद घालण्याची हि संकल्पना राबविली जाते आहे असे अरविंद शिंदे यांनी सांगितले.