पुणे- बांबू लावूनही लोक ये जा करतात ,लॉक डाउन चा उद्देश सफल होत नाही म्हणून आज रात्री 11 नंतर पुण्यातील रेड झोन एरिया पत्रे लाऊन सील करण्यास प्रारंभ झाला . घराबाहेर पडू नका म्हणून स्पिकरवरुन सकाळ पासून आवाहन करण्यास आज काही ठिकाणी तर उदयापासुन संपूर्ण रेड झोन परिसरात प्रारंभ होणार आहे. कमी जागेतील , छोट्या छोट्या घरात जास्त व्यक्तसंख्या असलेल्या कुटुंबांची अवस्था अर्थातच त्रासदायी होणार आहे. घरात राहुनही त्यांना फिजिकली डिस्टन्स पाळता येणे मुश्किल होणार आहे . अशा अवस्थेत रेड झोनला आता आणखी खड़तर सामना करावा लागणार आहे.
कोणी आत जाऊ शकणार नाही, आणि कोणी बाहेर येवू शकणार नाही असे असले तरी सकाळी 10 ते 2 यावेळेत जीवनावश्यक म्हणजे भाजीपाला, दूध , किराणामालाची इथली आतिल दुकाने रहिवाशाना उपलब्ध असणार आहेत.
त्तपुर्वी शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत कामगार पुतळा झोपडपट्टी व राजीव गांधीनगर, जुना तोफखाना येथे मेगा फोनद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांना मास्क वापरणे, सॅनिटायझर/ साबणाचा वापर करणे, स्वच्छता राखणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे याबाबत महापालिका सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांनी नागरिकांना करोनाबाबत सूचना दिल्या.