पुणे- महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयातून ६२ लाखाचा डांबरीकरण प्रस्ताव चोरून दडवून ठेवल्याचा बालिश आणि खोटा आरोप भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला आहे लाटेत निवडून आलेल्या बालवडकरांनी स्वतःच्या हाथाने स्वतः साठी खड्डा खांद्ण्याचा केल्याचा हा प्रयत्न ठरणार आहे असा दावा करत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी बालवडकरांचे हे प्रयत्न ,आरोप हास्यासपद असल्याचे म्हटले आहे. बालवडकर यांनी महापालिका आयुक्त यांना पत्र देऊन चांदेरे यांच्यावर आरोप केले होते त्यासंदर्भात आज माय मराठी वर वृत्त प्रसारित झाले . त्यासंदर्भात आपली बाजू मांडताना हे आरोप फेटाळून लावले .
ते म्हणाले उलट जिथे हे डांबरीकरण प्रस्तावित केले आहे तिथे वृक्षतोड झाल्याची तक्रार याच बालवडकर यांनी केली होती . आणि तेथील वृक्ष तोडीचे प्रकरण अजून मिटलेले नाही . अशा स्थितीत त्यांनी माझ्यावर केलेले आरोप हास्यासपद आहेत