फडणविसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा -राष्ट्रवादी ची मागणी
महिला -मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची मुक निदर्शने
पुणे : महिला व बालिका यांच्यावर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर पावसात मुक निदर्शन करण्यात आली.
महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला अाहे , महिलांवर , बालिकांवर अन्याय ,अत्याचार , खून , बलात्कार यासारख्या धटना वारंवार होत आहेत , प्रशासनाचा अश्या नराधमांवर वचकच राहीलेला नाही जे यांच्याकडे गृहमंत्री पद आहे तेच मुख्यमंत्री ही आहेत स्वपक्षाच्या प्रचारयात्रा काढण्याच्या नादात त्यांना आपल्या कर्तव्याचाही विसर पडलेला आहे , माता भगिनींच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारचीच आहे ती झेपत नसल्यामुळे गृहमंत्री पदाचा त्यांनी त्वरित. राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी आज करण्यात आली प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर शहराध्यक्षा सौ स्वाती पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली मुक आंदोलन करण्यात आले आंदोलनास जयदेव गायकवाड ,कमल ढोले पाटील , लक्ष्मी दुधाने ,दीपाली धुमाळ , रोहिणी चिमटे प्रदीप देशमुख , रविन्द्र माळवदकर , वनराज आंदेकर , महेश हांडे ,अश्विनी परेरा विशाल मोरे , अजीम गुडाखुवाला, भोलासिंग अरोरा ,फहीम शेख , आदि उपस्थित होते.