पुणे -वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वाची समजली जाणारी नीट या देशपातळीवरील प्रवेश परीक्षेमध्ये चाटे शिक्षण समूहातील १९७ विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश संपादन केले.राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या जवळ जवळ सर्वच परीक्षांमध्ये जसे की जेईई मेन ,जेईई ॲडवांस इत्यादी परीक्षांमध्ये देखील चाटे च्या विद्यार्थ्यांनी यावर्षी दैदिप्यमान असे यश मिळवत चाटें ची उज्वल यशाची परंपरा कायम राखली. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रा फुलचंद चाटे सर,संचालक चाटे शिक्षण समूह पुणे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. झूम मीटिंग द्वारे आयोजित कौतुक सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
नीट परीक्षेमध्ये नीयती केंभवी -617, सुदर्शन पाटील-615, साक्षी दळवी-592, खोपडे पूरब-571, वरून जोशी-560, वैष्णवी जाधव-554, शोएब अत्तर-543, सुमेधा भोसले-509, हार्दिक साखलीकर-508 इत्यादी विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवत वैद्यकीय प्रवेशाकरिता पात्र ठरले.
अकरावी आणि बारावी ही दोन वर्ष विद्यार्थ्यांनी चाटे शिक्षण समूहाच्या कार्यप्रणाली नुसार अविरत मेहनत घेतल्याने विद्यार्थ्यांना हे अद्वितीय असे यश संपादन करता आले असे यावेळी प्रा चाटे सर म्हणाले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकांसमवेत सर्व शिक्षक वृंद व चाटे शिक्षण समूहास दिले. यावेळी पालकांनी चाटे शिक्षण समूहाचे मनःपूर्वक आभार मानले.