पुणे – 25 मे व्यापारी एकता दिनानिमित्त नगरसेवक व मातृ-पितृ प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात व्यापार करणाऱ्या अकरा व्यापाऱ्यांचा पुष्पगुच्छ व आरोग्य किट देऊन सत्कार करण्यात आला.
अकरा व्यापाऱ्यांमध्ये प्रविण मसाला ग्रुपचे राहुल नाहार, संतोष राऊत सच्चा सौदा पिढीचे विनोद गोयल तसेच भगवानदास तुळसिदास (गांधी गोळी) वाले तर्फे विजय गांधी व उज्वला गांधी,ताई मेस चे आशा बोत्रे, श्रद्धा इंटरप्राईजेस चे पंकज खत्री,पूजा मेडिकल चे गणेश देवराय, सिद्दि कॉर्नर चे संतोष शहा,राठी ट्रेडिंगचे बाळू राठी,एस पी ट्रेडिंगचे शिवकुमार गोयल अश्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यापाऱ्यांचे सत्कार या वेळी करण्यात आले.
आजचा दिवस 25 मे हा व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे. जगामध्ये अनेक डे साजरे होतात.व्यापारी हा एक मुख्य घटक आहे. म्हणूनच आजच्या दिवसानिमित्त व्यापारी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यापाऱ्यांचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे असे मत नगरसेवक प्रविण चोरबेले यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले.
याप्रसंगी अनिल भन्साळी,संजय चोरडिया, अनिल अगरवाल, शिवा केगारे, प्रमोद छाजेड, किशोर मेगावत, महेश कांबळे, मयूर कोठारी, राज ललवाणी,अमित माशाळे, गणेश शिंदे, सावत बनसोडे, परमेश्वर पुटगे हआदी मान्यवर उपस्थित होते.