पुणे–विमानगर परिसरात कोकेनची तस्करी करण्याच्या प्रयत्नातील आरोपीला अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून 10 लाख 42 हजारांचे कोकेन , दोन मोबाइल, मोटार असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती शुक्रवारी देण्यात आली. दरम्यान पोलिसांनी सांगितले कि , जानेवारी २०२२ पासून ते आजपर्यंत सुमारे साडेपाच कोटीचे अंमली पदार्थ पुणे पोलिसांनी पकडले आणि ९२ जणांना या प्रकरणी गजाआड केले .
पोलिसांनी सांगितले कि,अख्तर नुरलहोदा शेख, वय-३४ वर्षे, रा. स. नं. २६१, कलवड वस्ती धानोरी जकात नाका, पुणे मुळगांव-मुजफ्फरपुर,कांटीगाव, बिहार राज्य यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 10 लाख 42 हजारांचे ५२ ग्रॅम १२० मिलीग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक-०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, लक्ष्गण ढेंगळे, शैलजा जानकर व स्टाफ अरों दिनांक २२/१२/२०२२ रोजी विमानतळ पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,एक इसम विमानगर परिसरा मध्ये स्विफ्ट गाडी क्रमांक एमएच / १२ / केजे/२९३४ यामधुन कोकेन या अंमली
पदार्थाची विक्री करीत आहे. मिळालेल्या बातमीच्या अनुशंगाने विमाननगर येथील स.नं. २१० / २ विमाननगर, कोनार्कनगर
सोसायटी समोरील, वाघेश्वर वॉशिंग सेंटर समोर, सार्वजनिक रोडवर सापळा रचला असता,
मिळालेल्या बातमीतील एक इसम हा स्विफ्ट गाडी क्रमांक एमएच / १२ / केजे/२९३४ या गाडीस टेकुन
संशयितरीत्या उभा असलेला दिसल्याने, अंमली पदार्थ विरोधी पथकातील स्टाफने इसम नामे अख्तर
नुरलहोदा शेख, वय-३४ वर्षे, रा. स. नं. २६१, कलवड वस्ती धानोरी जकात नाका, पुणे मुळगांव-मुजफ्फरपुर,
कांटीगाव, बिहार राज्य यांस ताब्यात घेवुन, त्याची झडती घेतली असता,५२ ग्रॅम १२० मिलीग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ मिळुन
आले आहे. त्याचेविरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन येथे एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ ( क ),२१(ब), प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई ही पोलीस आयुक्त, पुणे शहररितेश कुमार, पोलीस सह आयुक्त,
संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे,
सहा पो आयुक्त,गुन्हे – १, गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-१ गुन्हे
शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे,
शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, विशाल शिंदे, योगेश मोहिते, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, पांडुरंग
पवार, विशाल दळवी, संदिप शिर्के, सुजित वाडेकर, राहुल जोशी, सचिन माळवे, संदेश काकडे, नितेश
जाधव, रेहाना शेख यांनी केली आहे.
जानेवारी २०२२ पासुन ते डिसेंबर २०२२ पर्यंत अंमली पदार्थ विरोधी पथक-१ यांचेकडुन
५,३६,१३,२५०/- रुकिचा (पाच कोटी छत्तीस लाख तेरा हजार दोनशे पन्नास रुपये) अंमली पदार्थ जप्त
करण्यात आले आहेत. त्यामध्ये ७०,०१,०२० /- किमतीचा गांजा व ९,९१,२९०/- रु किंमतीचे अफिम १,८४,५४,६००/-
किंमती चा मेफेड्रॉन (एम.डी.) २,६४,९६,६५०/- रु. किमतीचे कोकेन ५८,३५०/- रु किं चे ब्राऊन शुगर १,१०,०००/-
रुकिचा एम. डी. एम. ए. १,८१,७२० /- रूकिचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये
एकुण ९२ आरोपींना अटक करण्यात आले आहे.