डॉ. अमित कामले यांनी वडिलांप्रती कृतज्ञतापूर्वक लिहीलेल्या
‘मेरे पापा’ या आल्बमचे व ‘जयदीप’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन
• ‘मेरे पापा’ गाण्याला प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रह्मण्यम यांचा स्वर
• जयदीप चरित्रग्रंथाचे ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रकाशन
पुणे – ख्रिस्त शिकवण भक्तिसंगीत उद्योगातील नामवंत व्यक्तीमत्त्व व संगीतकार तसेच ग्लोरीफाय ख्राईस्टचे संस्थापक व संचालक डॉ. अमित कामले यांच्या ‘मेरे पापा’ या आल्बमचे तसेच त्यांचे वडील डॉ. दीपक कामले यांच्यावरील ‘जयदीप’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन आज येथे झाले. डॉ. दीपक कामले यांच्या ६६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून अमित यांनी स्वतः लिहीलेला व संगीतबद्ध केलेला ‘मेरे पापा’ हा आल्बम गीत वडिलांना अर्पण केला. या गीतांना प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रह्मण्यम यांनी स्वर दिला आहे.
यासंदर्भात बोलताना डॉ. अमित म्हणाले, “एसपी बालसुब्रह्मण्यम सरांसारख्या महान गायकाने माझ्या रचना गाणे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. त्यांनी या आल्बममधील गाणी अत्यंत प्रेमाने व भावमधुर गायली आहेत. मेरे पापा हा आल्बम म्हणजे माझे वडील डॉ. दीपक कामले यांच्याप्रती माझ्या कृतज्ञतेचे प्रतिक आहे.”
या गाण्यांचे चित्रण मिरजेच्या वॉनलेस हॉस्पिटलच्या रम्य परिसरात झाले असून त्यानिमित्त डॉ. दीपक व डॉ. अमित हे पिता-पुत्र प्रथमच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ‘मेरे पापा’ आल्बम हृदयस्पर्शी गीत अत्यंत मधुर संगीताने नटला असून श्रोत्यांच्या मनाला नक्कीच भिडणारा आहे.
वडील डॉ. दीपक कामले यांचा आजचा वाढदिवस अधिक संस्मरणीय करण्यासाठी डॉ. अमित यांनी त्यांना आणखी एक भावपूर्ण भेट दिली आहे. डॉ. दीपक कामले यांच्या जयदीप या चरित्र ग्रंथाचे प्रकाशनही आज प्रसिद्ध ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने झाले. ‘जयदीप’ हे शीर्षक अत्यंत अर्थपूर्ण असून त्यात अमित यांच्या आई जया व वडील दीपक यांच्या नावाचा सुरेख संगम आहे. पुस्तकात डॉ. दीपक यांच्या बालपणातील कहाण्या, त्यांचे शालेय जीवन, वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण व मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटलचे संचालक बनण्यापर्यंतचा प्रवास वर्णन केला असून त्याद्वारे त्यांच्या सुवर्णमयी व्यक्तीमत्त्वाची ओळख करुन दिली आहे.
डॉ. अमित यांनी यानिमित्त पत्नी पोर्णिमा व कन्या अद्विता यांच्याप्रतीही त्यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
हा आल्बम व पुस्तक दोन्ही नक्कीच यशस्वी ठरतील. ‘मेरे पापा’ या गाण्यातून श्रोत्यांना वडील व मुलातील भावस्पर्शी नात्याची अनुभूती मिळेल तर पुस्तकातून वाचकांना प्रेरणा मिळेल.