पुणे- पुण्याचे माजी उपमहापौर आणि पुण्यातील बहुसंख्य युवकांचे नेते दीपक मानकर यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पहिल्या पुणे दौऱ्यात सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात यावेळी महाआरतीही गृहमंत्र्यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी फुले पगडी घालून त्यांचं गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केलं. मंदिरासमोर असलेली ऐतिहासिक आणि समतेचा संदेश देणारी भिडेवाडा ही वास्तू पुनरुज्जीवीत व्हावी आणि समाजातील सर्व घटकांना नव्याने प्रेरणादायी ठरेल असे स्मारक व्हावे, या भावनेतून देशमुख यांचा फुले पगडीने सत्कार केला.दत्ता सागरे आणि दीपक मानकर यांचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .