पुणे, 27 ऑक्टोबर 2022
महिला सशक्तीकरणाच्या उद्दिष्टाला अधिक बळकटी देण्यासाठी , पायदळ दिनानिमित्त, दि. 27 ऑक्टोबर 2022 रोजी दक्षिण कमांडच्या वतीने पुणे येथे पंधरा वीर नारींना एका कार्यक्रमामध्ये ‘एडब्ल्यूडब्ल्यूए’ च्या प्रादेशिक अध्यक्ष अनिता नैन यांच्या हस्ते ई-स्कूटी प्रदान करण्यात आल्या . ई-स्कूटी प्रदान करण्याचा समारंभ दक्षिण कमांड अंतर्गत येणा-या पुणे, जैसलमेर, बेळगाव, सिकंदराबाद आणि भोपाळ या पाच विभागांमध्ये एकाचवेळी पार पडला. स्कूटीमुळे या वीर नारींना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या परिवाराला गतिशीलता मिळेल . तसेच त्या स्वावलंबी बनतील.