पुणे विभागातील 18 लाख 94 हजार 112 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 19 लाख 58 हजार 167 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 7 :- पुणे विभागातील 18 लाख 94 हजार 112 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 58 हजार 167 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 628 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 40 हजार 427 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.73 टक्के आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 21 हजार 91 रुग्णांपैकी 10 लाख 93 हजार 144 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 306 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 641 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.51 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 42 हजार 306 रुग्णांपैकी 2 लाख 28 हजार 400 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 817 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 95 हजार 789 रुग्णांपैकी 1 लाख 88 हजार 185 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 736 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 868 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 94 हजार 289 रुग्णांपैकी 1 लाख 86 हजार 707 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 469 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 4 हजार 692 रुग्णांपैकी 1 लाख 97 हजार 676 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 300 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 716 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 742 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 728, सातारा जिल्ह्यात 308, सोलापूर जिल्ह्यात 230, सांगली जिल्ह्यात 363 तर कोल्हापूर जिल्ह्यात 113 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 317 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 332, सातारा जिल्हयामध्ये 87 , सोलापूर जिल्हयामध्ये 340, सांगली 408 जिल्हयामध्ये व कोल्हापूर जिल्हयामध्ये 150 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 57 लाख 39 हजार 282 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 58 हजार 197 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 6 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )