पुणे : अल्पसंख्याक बहुल शासन मान्य खाजगी शाळा कनिष्ठ महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2019-20 अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या शासन मान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देवून शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा, व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान देण्याच्या योजनेस अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक क्रमांक अविवि/2019/प्र.क्र./99/का-6, दि. 24 ऑक्टोबर 2019 अन्वये सन 2019-20 मध्ये राबविण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर योजनेचे सन 2019-20 साठीचे परिपूर्ण प्रस्ताव, अल्पसंख्याक बहुल, शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंगासाठीची शाळा यांनी दि. 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हा नियोजन कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, बी विंग पहिला मजला पुणे येथे कार्यालयीन वेळेत सादर करावा असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी प्र. रा. केंभावी यांनी केले आहे.