पुणे,दि.16 :- महाराष्ट्र व्यवसायकर कायदा- १९७५अन्वये नावनोंदणीकृत, नोंदणीकृत नसलेल्या व्यक्ती, मालक, संस्था, धंदा, व्यापारी किंवा व्यावसायीक यांना व्यवसायकर नोंदणी प्रक्रियत सहकार्य करण्यासाठी व्यवसायकर विभाग, यांच्याकडून विशेष नोंदणी अभियान ९ फेब्रुवारी २०१९ पर्यंत राबविण्यात येत आहे.व्यवसायकर कादयाअंतर्गत नावनोंदणीकृत, नोंदणीकृत नसलेल्या व्यक्ती, मालक, संस्था, धंदा, व्यापारी किंवा व्यावसायीक इत्यांदींना व्यवसायकराची नोंदणी करणे आवश्यक आहे. याकरीता शासनआपल्या दारी या उपक्रमानुसार, व्यवसायकर अधिकारी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी अथवा परिसराला भेट देणार आहेत. अनोंदीत असल्यास जागेवर नोंदणी करुन घेतली जाणार आहे. तसेच नोंदणीकरीता बाजारपेठा, मॉल, व्यावसायीक केंद्रे, औद्योगिक वसाहती या ठिकाणी नोंदणी शिबीरे घेण्यात येणार आहेत.
त्याबाबतचे ठिकाण, तारीख www.mahagst.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. याबरोबरच वस्तु व सेवाकर भवन, तळ मजला, विमानतळ रोड, येरवडा, पुणे ४११००६, येथे मदत कक्ष उपलब्ध करण्यात येणार आहे. तरी अनोंदीत नावनोंदणी, नोंदणी करदात्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवसायकर पुणे विभागाचे अप्पर राज्यकर आयुक्त विलास इंदलकर, राज्य सहआयुक्त प्रदीप चिन्नी व राज्यकर उपायुक्त श्रीमती मनिषा वाघमोडे यांनी केले आहे.