पुणे- फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फॉउंडेशन, पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे प्रथमच ब्राम्हण कुटुंबात महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यसोधक पध्दतीने सत्यशोधक अॅड.सिद्धार्थ विठ्ठलराव लिखिते,एल एल एम,लंडन स्थायिक (पुणे ) आणि सत्यशोधिका डॉ.कवल प्रित कौर हरभजन सिंग, लुधियाना – पंजाब,लंडन उच्चशिक्षित वधु वर यांचा पुणे येथील श्रृती मंगलकार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वेला दि.25 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10.50 वा. संपन्न झाला.हा सत्यशोधक विवाह विधिकर्ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे चे माजी शहराध्यक्ष व महात्मा फुले साहित्य साधने प्रकाशनसमिती, महाराष्ट्र शासन चे सदस्य आणि संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ ढोक ह्यांनी महात्मा फुले यांचे वेशभुषेत तर प्रा.गायत्री लडकत ह्यांनी सावित्रीबाई फुले यांचे वेशभुषेत सहकारी हनुमंत टिळेकर,प्रा.सुदाम धाडगे यांचे सोबत मराठी,हिन्दी आणि इंग्रजी भाषेत प्रथमच लावला होता. या प्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की या विद्यानयुगात अंधश्रद्धा,कर्मकांड , महुर्त न पहाता लिखिते आणि सिंग परिवाराने सत्यशोधक विवाह करून जो आदर्श दिला ती वाटचाल पुढे चालू रहावी.तसेच असे विवाह रघुनाथराव ढोक यांनी यापुढे सार्वजनिक ठिकाणी लावले तर बहुजन समाज लवकर जागृत होईल,यासाठी मोलाची मदत करु असे आश्वासन दिले तर माजी मंत्री व पुणे विद्यार्थी गृहाचे नियामक मंडळाचे अध्यक्ष राधा कृष्ण विखे पाटील यांनी आशीर्वाद पर शुभाशीर्वाद दिले.या सत्यशोधक विवाहाचे नोंदणी रजिस्टर मध्ये साक्षीदार म्हणून खासदार श्रीनिवास पाटील व माजी मंत्री विखेपाटील यांनी सह्या केल्या हे विशेष होते तसेच यांचे शुभहस्ते वधु वर यांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व महात्मा फुले आणि सावित्रिमाई फुले यांची प्रतिमा रघुनाथ ढोक यांनी भेट दिली. मुंबई, नाशिक पुणे येथील विविध 70 संस्था पदाधिकारी यांना भारतीय सविंधान 2014 व 2019, सावित्रिमाई फुले व इतर ग्रँथ 70 वा प्रजासत्ताक दिनानिमित भेट दिले.सिद्धार्थ लिखिते ,लंडन वरुन येऊन त्यांनी प्रथम लाल महालात माता जिजाऊ यांचे आणि छत्रपती बाल शिवाजी यांचे पुतळ्यास तसेच महात्मा फुले वाडा,समताभूमी येथे थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे पुतळ्यास आई समवेत पुष्पहार अर्पण करून सत्यसोधक विवाहाची प्रथम पत्रिका ठेवली.नंतरच सगे सोयरे यांना पत्रिका वाटप केल्या होते. या विवाह प्रसंगी डॉ. देवीसिंग शेखावत , पुणे विध्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे,कार्यवाह प्रा.राजेंद्र कांबळे , कुलसचिव सुनील रेडेकर व सर्व विश्वस्त न्यायाधीश,वकील, परदेशी मित्र परिवार उपस्थित होता. हा विवाह आंतरराष्ट्रीय , आंतरराज्यीय , आंतरधर्मीय , आंतरजातीय पुण्यनगरित पहिला सत्यशोधक पद्ध्तीने संपन्न झाल्यामुळे व अक्षता म्हणून फुलांच्या पाकळया व टाळया वाजवून अनेकांनी वधु वर व त्यांचे परिवारांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सुरुवातीला वधु वरांचे हस्ते महात्मा फुले आणि सावित्रिमाई फुले यांचे पुतळयास व कै. विठ्ल लिखिते यांचे फ़ोटो ला श्रीमती पौर्णिमा लिखिते यांनी पुष्पहार अर्पण केला.