पुणे :
कोंढव्यातील रहिवासी नागरी समस्यांनी त्रस्त झाले असून पावसाने विकास कामाचे दावे खोटे पडले आहेत. इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम बागवान यांनी ही माहिती दिली.
पुणे प्रभाग क्रमांक २७ कोंढवा खुर्द येथील शिवनेरी नगर ,भाग्योदयनगर मिठानगर,साईबाबानगर ४२ व इतर ठिकाणी लाखोंची निविदा भरून बनविलेले रस्ते आज खड्डेमय बनले आहेत. गटारी झाकणे तोडून वाहत आहेत, गेले पाच वर्ष काम कमी आणी कार्यक्षम तेचा ढिंढोराच जास्त वाजविला गेला, शिक्षणाची गैरसोय महानगरपालीका शाळेची अवस्था पाहण्या जोगी झाली आहे. शाळेत विदयार्थी संख्या जास्त असल्याने एकाच वर्गात अनेक इयत्तेचे विद्यार्थी बसवले आहेत.
हज हाऊस आश्वासन ठरले खोटे :
विकास कामात केलेले दावे खोटे ठरले आहेत. ओटा मार्केट,लायब्ररी, मुस्लिम मते घेण्याकरीता उद्दघाटन करूनहि पुर्ण न झालेले हज हाऊस,पाण्याची टाकी, सांस्कृतिक हॉल यावर माजी नगरसेवकांनी उत्तर द्यावे, असे
असलम इसाक बागवान यांनी म्हटले आहे.