पुणे- राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पुण्यातहि ठीकठिकाणी सरकारी व खासगी दवाखान्यात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटल येथे लसीकरणा चा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती भाजपाचे नगरसेवक आदित्य माळवे यांनी दिली. या वेळी लसीकरण्यासाठी ठरवून दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार लसीकारण केले जात असून जास्तीत जास्त नागरिकांनी कोविन ॲपवर नाव नोंदणी करून लस घ्यावी असे आवाहन नगरसेवक आदित्य माळवे यांनी केले आहे. या प्रसंगी डॉ. मुळे, क्षेत्रिय अधिकारी आशा राऊत, डॉ. कोलते डॉ.घारे,विशाल धुमाळ व इतर कर्मचारी नागरिक उपस्तीत होते.