पुणे- घरातले सारेच कोरोना पाॅझीटीव्ह,घरी उरलेल्या एकट्या तरुणीने आपल्या आप्तीयांच्या,स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने ..साऱ्या समस्यांवर मात केली आणि मग काय तिच्या घरच्यांनी हि कोरोनावर मात करत हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेतला तिच्या आनंदाला पारावर उरला नाही अशा धनकवडीतील सलोनी सातपुते च्या पाठीवर आज भाजपने थाप दिली . भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर ,तसेच मोहिनी देवकर ,गणेश भिंताडे यांनी आज या कुटुंबाची भेट घेऊन सलोनी च्या धैर्याचे कौतुक केले .आणि तिच्या घरच्या सर्वांचाच सन्मान केला.
घरातले सारेच कोरोना पाॅझीटीव्ह ,एकटीच हि तरुणी उरली जीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला , सारे हॉस्पिटलमध्ये ..आणि ‘ती ‘एकटीच घरात ..हॉस्पिटल चा खर्च ..देखभाल ..घरातल्या समस्या साहजिकच सर्वांना ‘टेन्शन’..पण शालेय जीवनापासून सामजिक कार्याबाबत अनुकुलता असलेल्या तिच्या मनाने हे आव्हान स्वीकारले , आप्तीयांसह नगरसेविका असलेल्या वर्ष तापकिरांना फोन केला . आणि कुठून कोण जाणे तिला बळ मिळाले .. हे सारे आव्हान तिने लीलया पेलले … १४ दिवसांच्या एकांतवासीय जीवनाला तिने फोन ,व्हिडीओ कॉल, आप्तीयांच्या मदतीने आपलेसे केले आणि ते पाहून ‘ती च्या घरातील पाॅझीटीव्ह निघालेल्या आणि उपचार घेणाऱ्यांनी हि भरारी घेतली आणि मग कोरोनावर मात करून घरी परतलेल्या आपल्या आई ,बाबा, आजी, आजोबा आणि बहिणीचे तिने असे केले स्वागत ..आणि कोरोना ला असे केले ..टाय टाय फिश ..कि तिच्या स्वागतपर आनंदाचा मोबाईल व्हिडीओ असा व्हायरल झाला कि सर्वांच्या नजर वेधल्या … आनंदी राहा ,खंबीर राहा आणि कोरोनाचा मुकाबला करा असा सहजगत्या संदेश तिच्या नृत्याच्या लहरीने वाऱ्यासारखा पसरला . ..तो एवढा व्हायरल झाला कि , तिच्यावर शाबासकीचा पाउस पडला . तिने आपल्याला मदत करणाऱ्या आणि नैराश्य येवू न दिलेल्या आप्तीयांचे देखील आभार मानले.