पुणे. कोरोना विषाणूचा संसर्ग सातत्याने वाढताना दिसत आहे. सामान्य व्यक्तींसह कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा होत आहे. दरम्यान पुण्यातून एक धोकादायक बातमी आहे. पुण्यातील महानगरपालिकेची इमारतच आता कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण पुणे पालिकेत नेहमीच येत जात असणाऱ्या नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांसह त्यांच्या नातलगांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.दरम्यान आतापर्यंत पुणे पालिकेतील 108 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे आता पुणे महापालिका इमारतच कोरोना हॉटस्पॉट ठरणार का? अशी भीती निर्माण झाली आहे. कारण महापालिकेच्या इमारतीमध्ये दिवसभरात कामानिमित्त अनेक लोकांचा वावर असतो. अनेकांची पालिकेमध्ये कामं असतात. मात्र यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची दाट शक्यता आहे. पुणे महापालिकेतील एकूण 108 कोरोना बाधितांमध्ये 44 सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण 108 कर्मचाऱ्यांपैकी 53 जणांनी यशस्वी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.तर 45 जणांवर अजूनही उपचार सुरु आहेत