पुणे, ता.१७ : औंध -बोपोडी परिसरातील नागरिकांना विद्यापीठ परिसरामध्ये फिरण्यासाठी तसेच व्यायामासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती आज भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर तसेच कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी योगेश केरकर, सुनील दैठणकर, हिमांशु मुथय्या, ऋषभ काळे, अनिल माने, प्रतिक वाघमारे आदि उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर जवळ असल्याने औंध,औंधरोड, बोपोडी,खडकी स्टेशन परिसरातील सर्वसामान्य नागरिक विद्यापीठाच्या आवारात सकाळी तसेच सायंकाळी व्यायामासाठी तसेच फिरण्यासाठी येत असतात. विद्यापीठ प्रशासनाने ‘एसपीपीयू ऑक्सीपार्क’ योजने अंतर्गत विद्यापीठामध्ये व्यायामाला, फिरायला येणाऱ्यांना शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला नगरिकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्याने विद्यापीठ प्रशासनाने तो निर्णय मागे घेतला. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने कोरोना काळात नागरिकांना विद्यापीठ आवारामध्ये फिरण्यासाठी तसेच व्यायामासाठी बंदी घातली होती. मात्र आता सरकार मार्फत अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असल्याने सर्व व्यवहार सुरळीत सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यापीठ परिसर ही नागरिकांना व्यायामासाठी आणि फिरण्यासाठी खुला करणे आवश्यक आहे. याबाबत आपण लक्ष घालून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती त्यांनी या निवेदनाद्वारे कुलगुरूंना केली आहे. कुलगुरूंनीही याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.