पिंपरी :- विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन त्याचा फायदा केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर समाजाला करुन देणाऱ्या व्यक्तिमत्वांना गोयल गंगा फाऊंडेशनच्या वतीने गुरुवर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. गुरुवर्य पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. येत्या १४ डिसेंबरला या वल्लभनगर येथील गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या आवारात हा कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती गोयल गंगा फाऊंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल यांनी दिली.
यावर्षी हा पुरस्कार विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना मुलांच्या पालकांना देण्यात येणार आहे. त्यांच्याच खंबीर पाठिंब्यामुळे ही मुले आपापल्या क्षेत्रात यशस्वी कामगिरी करू शकतात. ऑलिंपिकमध्ये जलतरणात शानदार कामगिरी करणाऱ्या कॅमिला पटनायक हिच्या पालकांना, भारतीय महिला रग्बी संघाच्या कर्णधार वाहबिझ भरुचा यांचे प्रशिक्षक संजय कांबळे, मुलीच्या परिश्रमात तिला खंबीरपणे साथ देणाऱ्या प्रसिद्ध टेनिसपटू अंकिता रैनाच्या आई ललिता रैना यांना, बेघर मुलांचे पुनर्वसन करणाऱ्या राधिका दळवी, तसेच अनुभवावर आधारित शिक्षण मिळण्यासाठी आपल्या मुलींना होम स्कूलिंगच्या माध्यमातून शिकवणारे श्री व सौ कापशीकर यांना आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
याशिवाय सोहळ्यापुर्वी शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्णता, प्रत्येक दिवशी बदलणारे डिजिटल युग या आणि अशा अनेक विद्यार्थीकेंद्रित विषयांवर चर्चा करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आय आय टी चे प्राध्यापक मनीष जैन, व्ही. आय. टी गृपचे व्हीपी शिवप्रसाद मंत्री, मानसशास्त्रज्ञ श्रीधर माहेश्वरी असे अनेक शिक्षण क्षेत्रातील तज्ञ यावेळी उपस्थित असणार आहेत.
पुरस्कार हा केवळ त्यांचा गौरव नसून त्यांच्या कर्तुत्वाला दिलेली कौतुकाची थाप असल्याचेही गोयल गंगा इंटरनैशनल स्कुच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी आवर्जून नमूद केले.