पुणे :- बावधन मधील गंगा लेजंड येथे गोयल गंगा इंटरनैशनल मधील चिमुकल्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची जय्यत तयारी केली. यावेळी सर्ववयोगटातील मुलांनी आपल्या पालकांसोबत उत्साहाने सहभागी घेत पर्यावरणपूरक आकर्षक कंदील, तोरणे, पणत्या बनविण्याचे काम केले. चिमुकल्यांनी हातात रंगीबेरंगी कागद, स्केच पेन, खडू,माती आदींच्या सहाय्याने उत्कृष्ट कंदील आणि नक्षीदार पणत्या बनवल्या.
सर्वांच्या सहभागातून दिवाळीच्या उत्सवाला अधिक अर्थपूर्ण बनविण्यासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिवाळीच्या मंगलपर्वादरम्यान आपल्या कुठल्याच कृतीतून पर्यावरणाला हानी होणार नाही. याची सर्वांनी काळजी घ्यावी, अशा भावना स्कुलच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी व्यक्त केल्या.