पुणे :- आंब्याचा गोडवा समाजातील वंचित मुलांना चाखता यावा यासाठी नगर रोड येथील चोखी दाणी येथे गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने ‘आंबा फेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते. ४५०पेक्षा जास्त चिमुरडयांनी यावेळी आंब्याचा मनमुराद आनंद लुटला.
यावेळी समाजसेवक प्रदीप लोखंडे ,गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त अतुल गोयल ,अमित गोयल, चोखी दाणीचे अध्यक्ष अमित कुमार याप्रसंगी उपस्थित होते.
चोखी दाणी मधील रुचकर जेवणाबरोबरच मॅजिक शो,पपेट शो, गाणे,नृत्यकला, राजस्थानी गाणी-नृत्य आणि एकूणच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा बच्चेकंपनीने मनमुराद आस्वाद घेतला.
रॉबिन हूड आर्मी संस्थेने शहरातील अनेक वेगवेगळ्या भागांमधून ४०० हून अधिक वंचित मुलांना या ठिकाणी आंब्याचा आस्वाद घेता यावा यासाठी एकत्र आणले याशिवाय सोफोश मधील ४० हून अधिक विशेष मुलांनी देखील या आंबा फेस्टचा भरघोस आनंद लुटला. रॉबिन हूड आर्मीच्या स्वयंसेवकांनी देखील या मुलांना सांभाळण्यासाठी हातभार लावला.
समाजसेवक प्रदीप लोखंडे यांनी यावेळी मुलांशी संवाद साधला ते म्हणाले कि, भविष्यात आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रातच काम करा त्यात काम करताना तुमचं स्वतःचं वेगळेपण जोपासा आणि नेहमी लक्षात ठेवा आपल्यातील प्रत्येकजणाचे समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा आपल्या कमाई मधील काही भाग गरजू लोकांच्या आयुष्य बदलण्यासाठी सत्कारणी लावा.