पुणे-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार
मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली निघाली. पर्वती विधानसभा मतदार संघातील
रामनगर येथून या प्रचार रॅलीची जल्लोषात सुरुवात झाली. ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पहार
अर्पण करून मोहन जोशींचे स्वागत केले . मार्गावर अनेक ठिकाणी ताक, सरबत दिले
जात होते.
राम नगर येथून ही प्रचार रॅली विठ्ठल नगर – तुकाईनगर – आनंदनगर – महादेव नगर –
गणेश कॉलनी – दामोदर नगर – साई नगर – खोराडवस्ती – आनंद विहार – राजीव गांधी
वसाहत – विश्रांत नगर – हिंगणे खुर्द – सर्व्हे नं. २३/२६ – या मार्गाने जाऊन विठ्ठलवाडी येथे
समाप्त झाली.
या प्रचार रॅलीत विकास दांगट, शैलेश चरवड, बाळासाहेब कापरे, सचिन आडेकर,
सोनाली मारणे, आबा जगताप, चैतन्य पुरंदरे, राजा भाऊ चव्हाण, लहूअण्णा निवंगुणे, अजय
खोडे, नितीन शिंदे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित झाले होते.