पुणे -शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस भवन येथून सुरू झालेला हा ‘झेंडामार्च’ संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील पुतळ्याजवळ संपविण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार आज काँग्रेसच्या १३५ व्या स्थापना दिनानिमित्त संविधान वाचविण्यासाठी व हा देश एकसंघ राहण्यासाठी ‘झेंडामार्च’ चे आयोजन केले. देशामध्ये केद्रांतील मोदी सरकार जाती व धर्मांमध्ये एन. आर. सी. व सी. ए. ए. च्या माध्यमातून जाती – भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या घटनेला धक्का पोहचविण्याचे काम हे केंद्रातील सरकार करीत आहे. याच्या निषेधार्थ देशभरात बंधुता व
समानता राहावी आणि देशामध्ये लोकशाही टिकावी यासाठीच या ‘झेंडामार्च’ चे आयोजन करण्यात आले आहे.’’
यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, पक्षनेते अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, संगीता तिवारी आदींची भाषणे यावेळी झाली.
यावेळी माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, संजय बालगुडे, दिप्ती
चवधरी, आबा बागुल, नीता रजपूत, दत्ता बहिरट, अमिर शेख, वीरेंद्र किराड, लता राजगुरू, अविनाश बागवे, विनोद मथुरावाला, अजित दरेकर, अंजनी निम्हण, शानी नौशाद, बाळासाहेब दाभेकर, अनिल सोंडकर, सुजित यादव, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, प्रविण करपे, सतिश पवार, सुनिल घाडगे, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, विजय खळदकर, द. स. पोळेकर, रवि पाटोळे, सोनाली मारणे, साहिल केदारी, मंजूर शेख, भुषण रानभरे, शिलार रतनगिरी, प्रकाश पवार, उस्मान तांबोळी, विकास टिंगरे, रजनी त्रिभुवन, यासीन शेख, शाबीर खान, मुख्तार शेख,
किरण मात्रे, चैतन्य पुरंदरे, विजय जाधव, राजेंद्र शिरसाट, मीरा शिंदे, प्रकाश पवार, क्लेमेंट लाजरस, सुमित डांगी, विनय माळी, मधुकर चांदणे, हेमंत राजभोज, वाल्मिक जगताप, जावेद निलगर, बाळासाहेब आमराळे, अशोक जैन, राजेंद्र जगताप, प्रकाश आरणे, सुरेखा खंडागळे, अनुसया गायकवाड, कल्पना भोसले, संगीता क्षिरसागर, ताई कसबे, रोहित अवचिते, अनंत गांजवे, नारायण पाटोळे, सुनिल शिंदे, राजेंद्र पेशने, राजू शेख, नरसिंह अंदोली, शिवाजी बांगर, भगवान कडू, विठ्ठल गायकवाड, सुनिता नेमुर, जयकुमार ठोंबरे, अविनाश अडसुळ, राहुल तायडे, संजय कवडे, अजय खुडे, संगीता पवार, हनुमंत राऊत, अजित जाधव, राजेश शिंदे, सुरेश राठोड, अनिल आहिर आदींसह अनेक
पदाधिकारी उपस्थित होते.