मतविभागणीनेच कसबा एक विचारसरणीच्या हाथी-अरविंद शिंदे (व्हीडीओ)
पुणे- गेली २२ ते 23 वर्षे एक व्यक्ती आणि एक विचारसरणीने ग्रस्त असलेला कसबा विकासाची धरणी व्हावा म्हणून आता लोक बदल घडवतील असा विश्वास व्यक्त करताना मतविभागणी नेच कसबा अशा विचारसरणीच्या हाथी गेला आणि कास्ब्याचे नुकसान झाले अशा आशयाचे वक्तव्य आज कसबा विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस राष्ट्रवादी चे अधिकृत उमेदवार अरविंद शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना केले .
शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी च्या नेत्या खासदार वंदना चव्हाण ,कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यावेळी उपस्थित होते .