पुणे-काँग्रेसच्या कारकिर्दीत तूरडाळ, गॅस, रॉकेल वगैरे जीवनावश्यक वस्तू गरिबांच्या आवाक्यात होत्या, त्यासाठी काँग्रेसने अन्न सुरक्षा कायदा केला होता, मात्र भाजप सरकारने तूरडाळ 200 रुपये किलो, गॅस साडेआठशे वर नेऊन ठेवला, रॉकेल तर बाजारातून गायबच झाले, भाजपने गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतला, अशी खरमरीत टीका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाघाडीचे कॅन्टोन्मेंट मधील उमेदवार रमेश बागवे यांनी केली.घोरपडी बझार मध्ये झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते.
कॅन्टोन्मेंट मधील नागरिक एफएसआय वाढवून मिळवण्याची मागणी करत आहेत, पण भाजपच्या ताब्यातील कॅन्टोन्मेंट बोर्ड त्याकडे दुर्लक्ष करत आहे. खुद्द कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कामगारांना पगार देण्याच्या स्थितीत बोर्ड नाही. कारण केंद्राकडून बोर्डाला मिळणारा हजारो कोटी रुपयांचा निधी थकीत आहे, असे सांगून त्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डावर सडकून टीका केली.
डोबरवाडी येथील मैदान लष्कराने ताब्यात घेतले तेंव्हा मी मंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना प्रस्ताव पाठवून घोरपडी मधील फुटबॉलपटू साठी मैदान उपलब्ध करून दिले, असे बागवे यांनी यावेळी सांगितले.
वानवडी, घोरपडी बझार याठिकाणी झालेल्या या कोपरा सभांना स्थानिक नागरिकांनी अलोट गर्दी केली होती.
कॅन्टोन्मेंट भागातील प्रभाग क्र.21 व 7 मधील अनंत टॉकीज येथे पदयात्रेस सुरुवात झाली. श्रावस्तीनगर, बालाजीनगर, श्रीनाथनगर, निगडेनगर, कवडे मळा, अशा मार्गे जाऊन बीटी कवडे रोड येथे समारोप करण्यात आला.
या पदयात्रेस पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी, स्थानिक पदाधिकारी सुरेखा कवडे, पुणे सिटी प्रियदर्शिनी काँग्रेस च्या अध्यक्षा पूनम बोराटे, शांताराम कवडे, संजय कवडे, चंद्रकांत कवडे, प्रदिप परदेशी, संकेत कवडे, नंदू निंबाळकर, प्रशांत म्हस्के, क्लेमेंट लझरस, शामराव वाघमारे, टोनी अंथोनी, अमलराज फ्रान्सिस, अलविन आनंदराज, इतर मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भागातील पाणीप्रश्न, रेल्वेगेट समस्या, बेरोजगारीचा प्रश्न, कामगारांच्या वेतनाचा प्रश्न , सेवा सुविधांचा प्रश्न, आदी समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन बागवे यांनी यावेळी दिले, नागरिकांची बेरोजगारी दूर करण्यासाठी रमेश बागवे पूर्वी पासूनच कार्यरत आहेत .याही नंतर ते समाजातील बेरोजगारी व दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत . यासाठीच नागरिकांनी रमेश बागवे यांना विधानसभेत मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन पदाधिकारी यांनी नागरिकांना या पदयात्रेदरम्यान केले.
कॅन्टोन्मेंटचे भाजप आमदाराने भ्रष्टाचार केल्याने या मतदारसंघाची प्रतिमा मलिन झाली. भागाच्या विकासासाठी निधी खर्च केला नाही, पुन्हा एकदा विकासाचे वारे आणण्यासाठी मला विधानसभेत जाण्याची संधी नागरिक शंभर टक्के देतील, असा आत्मविश्वास महाआघाडीचे कॅन्टोन्मेंट मधील उमदेवार रमेश बागवे यांनी व्यक्त केला.