पुणे-पुण्यात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अजब विधान केलं आहे, सावित्रीमाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल बोलत चित्रा वाघ यांनी थेट ज्योतीबांशी दोघांची तुलना केली आहे .पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी करण्यात आली शिवाय ज्यांच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची कारकीर्द ,अपारदर्शक , संशयाची राहिली त्या हेमंत रासने यांचीही तुलना महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी करण्यात आली आहे. . यामुळे माळी समाजात आणि सावित्रीमाई आणि ज्योतीबांना मानणाऱ्या सर्वच नागरिकांत असंतोष निर्माण होण्याची चिन्हे आहेत .
चित्रा वाघ म्हणाल्या की, तुम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र हेमंत रासने आणि चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या ज्योतिबांचा शोध जारी आहे, असे विधान चित्रा वाघ यांनी केलं आहे. हेमंत रासने यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात चित्रा वाघ बोलत होत्या. दरम्यान चित्रा वाघ यांच्या विधानामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.