पुणे- काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन डॉ. प्रकाश आमटे ,पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉ. आमटे हे सध्या रक्ताच्या कर्करोगाने आजारी असून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुढील उपचार घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांना समजले. दौरा आटोपून रात्री त्यांनी डॉ.आमटे यांना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.या भेटीनंतर त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे, पुत्र डॉ. कौस्तुभ आमटे आणि इतर कुटुंबियांशी बोलून त्यांनी प्रकाश आमटे यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती घेतली. यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर देखील उपस्थित होते. यावेळी उदय सामंत, तानाजी सामंत,विजय शिवतारे, अजय भोसले, अनिल बाबर, बापू कोंडे, किरण साळी त्यांच्यासमवेत होते. .
खासदार बापट म्हणाले कि,’आपल्या जुन्या सहकाऱ्यांना न विसरता व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांची आवर्जून विचारपूस करायला कधी न विसरणारे, माझे महाराष्ट्र विधिमंडळातील जुने सहकारी व मित्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल पुणे दौऱ्यावर आले असता आणि दिवसभर व्यस्त कार्यक्रम असतानाही वेळात वेळ काढून रात्री उशिरा रुग्णालयात येवून आवर्जून माझी भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली. त्यामुळे बरे वाटले.