फटाक्यांच्या आतिषबाजी ने वेधले लक्ष
पुणे- यंदा शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी ,ढोल ताशाचा गजर आणि फुलांनी सजविलेला रथ अशी लक्षवेधी मिरवणूक छत्रपती राजाराम मंडळाने काढली होती
या विसर्जन मिरवणुक सुमारे ८ वाजता रात्री सुरवात झाली. कार्यकर्ते विसर्जन मिरवणुकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
” गणपती बाप्पा मोरिया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला ” या जय घोषणात बाप्पा चे विसर्जन करण्यात आले. अलका टॉकीज चौकात महापौर मुकता टिळक यांनी गणपती बाप्पा ची व छत्रपती राजाराम मंडळ कारविर निवासीनी कोल्हापूर येथील महालक्ष्मी अंबाबाई ची आरती केली, या वेळी छत्रपती राजाराम मंडळचे अध्धाक्ष युवराज निंबाळकर व मंडळातील पधादिकारी उपस्थित होते. महापौर यांनी युवराज निंबाळकर यांचे श्रीफळ देऊन स्वागत केले. विसर्जन अलका टॉकीज जवळ घाटावर बाप्पांचे विसर्जन ३. ३० वाजता करण्यात आले.