पुणे- आई वडिलांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा असून खरे विठ्ठल रुखमाई आपल्या घरातच आहेत असे प्रतिपादन आज येथे प्रा. फुलचंद चाटे यांनी केले. चाटे शिक्षण संस्थेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात ते बोलत होते . आमदार भीमराव तापकीर ,अॅड .संभाजीराजे थोरवे , जनहित फौन्डेशन चे अॅड. दिलीप जगताप राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष विठ्ठल जाधव ,सुरेश ढमाले ,अभिजित तांदळकर,सुनील जायभाय ,
अॅड.प्रवीण नलावडे आणि शेकडो पालक विद्यार्थी यांनी यावेळी भक्तीगीताना भरभरून दाद दिली. प्रसिध्द निवेदक संदीप पाटील, सूत्रसंचालक योगेश सुपेकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. अनिल गोंदकर ,कल्याणी शेळके
, रुपाली घोगरे ,शेखर गरुड ,हिम्मतकुमार पांड्या ,संतोष पवार ,अनिल बोर्डे ,हर्षल गणबोटे, नितीन खंडागळे, संजय ढगे या कलावंतांच्या समुहाने भक्तिगीते सादर करून सारे सभागृह भक्ती रसात चिंब केले.
पहा आणि ऐका .. या कार्यक्रमाची एक हलकीशी व्हिडीओ झलक …..