पुणे- कोरोना च्या आक्रमणा मुळे पुण्यात जम्बो रुग्णालय उभारणीस अवघे 25 टक्के रक्कम महापालिका देणार असताना त्यास आडकाठी आणणाऱ्या स्थायी समिति अध्यक्ष रासने यांना, चेअरमनसाहेब, पैशापेक्षा जीव महत्वाचा, जान है ते जहाँ है…असा सल्ला विपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी दिला आहे.आणि जम्बो रुग्णालयाला एक पैसा ही न देण्याच्या भूमिके बद्दल रासने यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांचा निषेध केला आहे.
यासंदर्भात त्यांनी असे म्हटले आहे की, राजकारण करण्याची हि वेळ नाही, तुम्ही मानधन रक्कम निधि म्हणून देताना टी राज्या कड़े न देता पीएम फंडा स म्हणजे केन्द्राला दिली, महामारीच्या काळात असे राजकारण करणे हे कोत्या बुद्धीचे लक्षण आहे.आपल्या सारख्या गणेश भक्ताने कसे वागले पाहिजे हे आम्ही सांगावयास नको उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विष्णाणु प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये पुण्यातील रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे जम्बो रुग्णालयाची उभारणी करणेबाबत निर्णय झाला असुन पुणेकरांसाठी पुणे शहरात जम्बो रुग्णालय उभारणी कामी २५ % निधी पुणे महानगरपालिकेने द्यावा असे ठरले होते.
भाजप सत्ताधारी व पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यांनी या निर्णयास विरोध दर्शविला असुन या पुर्वी कोरोनासाठी पुणे महानगरपालिकेचा मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचे सांगितले आहे. वास्तविक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जम्बो रुग्णालय उभारण्याचा निर्णय हा पुणेकरांसाठी घेतला असुन यासाठी पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीत कररुपी जमा केलेले नाममात्र पैसे खर्च करण्यास विरोध करणे म्हणजे भाजपचे सत्त्ताधारी यांना पुणेकरांविषयी कोणतेही गांभीर्य नाही असे दिसते. 75 टक्के रक्कम अन्यत्र ठिकानाहून येईल, पालिकेला केवळ 25 टक्के रक्कम वापरायचीआहेभाजपचे सत्त्ताधारी यांनी कोरोना विषयक नियोजन करताना गांभीर्य लक्षात न घेतल्याने निष्पाप पुणेकरांना आपला जीव गमवावा लागला हि वस्तुस्थिती आहे. पुणे महानगरपालिका स्तरावर आम्ही वेळोवेळी कोरोनाविषयक उपाय योजनाबाबत लेखी पत्र व्यवहा र, तोंडी सुचना देत असुन याकडे देखील भाजप सत्ताधारी यांनी जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जाते. राजकारण करण्याची व श्रेय घेण्याची हि वेळ नाही याचे भान भाजप सत्ताधारी यांना राहिलेले नाही. एका बाजुला पुणेकरांसाठी जम्बो रुग्णालय उभे करण्यास निधी नाही असे कारण द्यायचे व दुस-या बाजुला भाजप नगरसेवकांचे मानधन पी.एम केअर्स फंडा मध्ये जमा करायचे. खासदार निधी महापालिकेस द्यायचा नाही अशी दुटप्पी भुमिका भाजपचे सत्त्ताधारी घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व .सभासदांनी ओक्सिजन बेडसाठी सव्वा दोन कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच सर्व सभासंदच्या सह यादीतुन दहा टक्के निधी कोरोना विषयक कामासाठी पुर्वीच दिलेला आहे. पुणे शहरावर जेव्हा जेव्हा संकट आले त्या त्या वेळी पुणे शहरातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येवुन संकटाचा सामना केला. सद्यस्थितीत आमच्या माहितीप्रमाणे २००० ते २२०० कोंटीची मुदत ठेव पुणे महानगरपालिकेची असुनही पुणेकरांसाठी जम्बो रुग्णालय उभारणी कामी २५ % निधी देताना विरोध दर्शविणे हे पुणे शहराच्या संस्कृतीस धरुन नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सभासदांच्या वतीने आयुक्तांना विनंती आहे की, जम्बो रुग्णालय उभारणी कामी घेतलेला निर्णयानुसार कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र महापालिका आधिनियमानुसार आणीबाणीचा परिस्थितीत निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार आयुक्त यांस असुन त्यानुसार आयुक्तांनी जम्बो रुग्णालय उभारण्याची कार्यवाही तातडीने करावी. निर्णयाची अंमबजावणी करण्यात यावी, असे आयुक्त यांना पत्र देण्यांत आले आहे असे ही त्या म्हणाल्या.