पुणे- अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयात इंजिनिअर डे चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. मोक्षगोंडम विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या प्रसंगी बोलताना देशाच्या जडणघडणीमध्ये नवनिर्माता म्हणून इंजिनिअरचे योगदान महत्वाचे आहे. सर विश्वेश्वरय्या यांचे संपूर्ण जीवनचरित्र हे अभियंत्यांना सकारात्मक ऊर्जा देणारे असून सर्व अभियंत्यांनी मानव कल्याणासाठी अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर केला पाहिजे असे आवाहन केले. दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांना सोडवण्यासाठी अभियंत्यांनी अभियांत्रिकीमधील नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी संशोधनावर भर देण्याचे आवाहन इंजिनिअर डे च्या निमित्ताने उपस्थितांना केले. इंजिनिअर डे चे औचित्य साधून डॉ.शरदचंद्र लोहोकरे संचालक जोश एआय सोल्युशन प्रा. ली. यांचे इंजिनिअर्स फॉर रोबोटिक डिझाईन या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी टेक्नीकल पोस्टर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. गणेश कोंढाळकर व आर्टस् अँड क्रिएटिवव्हिटी क्लब च्या समन्वयक डॉ. गायत्री कांबळे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयाने हा कार्यक्रम कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम राबविल्याबद्दल संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.