पुणे-छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देखील त्याच उत्साहात आणि जल्लोषात साजरी झाली पाहिजे म्हणूनभाजप युमो पुणे शहर अध्यक्ष राघवेंद्र बापु मानकर यांच्या नेतृत्वाखाली मॉल मल्टिप्लेक्स मध्ये शिवजयंती साजरी करावी अशी आग्रही मागणी केली होती त्याला प्रतिसाद देऊन आज Phoenix mall,seasons mall,pavilion mall, westend mall,Kumar Pacific mall, Amanora mall, central mall,jaihind collections, p.n.gadgil,Ranka, Clai,hotel Ramee grand,Hyundai showrooms इत्यादी व मल्टिप्लेक्स या ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात येत होती . सर्व मॉल तसेच बडे व्यापारी यांनी अशा प्रकारे शिवजयंती ला विनम्र अभिवादन करून मिरवणुकीची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न केला.