पुणे: पुणे-पानशेत रस्त्यावर पानशेतजवळ कार खडकवासला धरणाच्या पाण्यात पडली असून कार मधील तीन जणांचा मृत्यू झाला असून एकाचा शोध पोलिस व स्थानिक नागरिक घेत आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी (दि.२) दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडली. कारमधून एकाच कुटुंबातील काहीजण विहीर गावातून कादवे घाट रस्ता मार्ग पानशेत रस्त्याने पुण्याकडे चालले होते. त्यावेळी माऊलाई मंदिराजवळ धरणात कार कोसळली.सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस कर्मचारी सूर्यकांत ओमासे यांनी दिलेल्या माहितीनुसार घटना घडली त्या ठिकाणी रस्त्यालगतच खडकवासला धरणाचे पात्र आहे. पुणे पानशेत रस्त्यावरून कार जात होती. या कारमध्ये चार जण होते. कार अचानक पाण्यात पडली.या ठिकाणी रस्त्याला वळण आहे. पोलिस व स्थानिक नागरिक गाडी पाण्याबाहेर अर्धवट काढली आहे. तिघा जणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले आहेत एक जण पाण्यात बेपत्ता झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पानशेत येथिल भोई समाजाच्या बांधव आणि त्यांची कायक बोट घेऊन शोधकार्य सुरू आहे.