अजिंक्य गायकवाडची शतकी खेळी;
पुणे, 20 जानेवारी 2021- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित एम 3 करंडक आंतर क्लब 23 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत गटसाखळी फेरीत अजिंक्य गायकवाड(109) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमी संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा 166धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला. तर, दुसऱ्या सामन्यात सचिन भोसले( 5-39व नाबाद 46) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाचा 4 गडी राखून पराभव करत विजय मिळविला.
पीवायसी हिंदू जिमखाना व डीव्हीसीए मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केडन्स क्रिकेट अकादमी संघाने 45 षटकात 9बाद 310 धावा केल्या. यात अजिंक्य गायकवाड याने अफलातून फलंदाजी करत 116 चेंडूत 14चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 109 धावांची शतकी खेळी केली. सलामीची जोडी अजिंक्य गायकवाड व अर्शिन कुलकर्णी(24धावा) यांनी पहिल्या गड्यासाठी 74चेंडूत 58धावांची भागीदारी करून सुरेख सुरुवात करून दिली. अर्शिन कुलकर्णी बाद झाल्यानंतर अजिंक्य याने निपुण गायकवाड(45धावा)च्या साथीत 103चेंडूत 108धावांची भागीदारी करून संघाची स्थिती भक्कम केली. त्यानंतर अथर्व काळे याने 29चेंडूत 6चौकार व 5षटकारांसह 62 धावा करून संघाला 310 धावांचे आव्हान उभे करून दिले. पीवायसीकडून साहिल चुरी(4-53), यश खळदकर(3-51) यांनी सुरेख गोलंदाजी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघ 35.1 षटकात 144 धावावर संपुष्ठात आला. यात अखिलेश गवळी 44, श्रेयश वाळेकर 30, साहिल चुरी 22 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. केडन्स संघाकडून शुभम हरपाळे(3-31), सिद्धेश वरघंटी(2-41), अजिंक्य गायकवाड(1-6), इझान सय्यद(1-27), यतीन मंगवाणी(1-26) यांनी अचूक गोलंदाजी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी शतकी खेळी करणारा अजिंक्य गायकवाड ठरला.
डीव्हीसीए मैदानावरील लढतीत अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी अचूक ठरविला. सचिन भोसले(5-39), वैभव विभुते(4-43), व्यंकटेश दराडे(1-21) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे व्हेरॉक क्रिकेट अकादमीचा डाव 40.2 षटकात 207धावावर कोसळला. यात पवन शहा याने 63चेंडूत 8चौकार व 2षटकारांसह सर्वाधिक 66धावांची खेळी केली. हे आव्हान अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने 38.5षटकात 6बाद 208धावा करून पूर्ण केले. यात सचिन भोसलेने 45चेंडूत 3चौकार व 3षटकारांच्या मदतीने नाबाद 46धावा व व्यंकटेश दराडे(नाबाद 46धावा) यांनी सहाव्या गड्यासाठी 99चेंडूत 96 धावांची भागीदारी करून संघाला सहज विजय मिळवून दिला. अष्टपैलू कामगिरी करणारा सचिन भोसले सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
केडन्स क्रिकेट अकादमी: 45 षटकात 9बाद 310 धावा(अजिंक्य गायकवाड 109(116,14×4,4×6), अथर्व काळे 62(29,6×4,5×6), निपुण गायकवाड 45(51,6×4), सिद्धेश वरघंटी 32(13,3×4,2×6), अर्शिन कुलकर्णी 24(32,3×4,1×6), कौशल तांबे 15, साहिल चुरी 4-53, यश खळदकर 3-51, आकाश जाधव 1-62) वि.वि.पीवायसी हिंदू जिमखाना:35.1 षटकात सर्वबाद 144 धावा(अखिलेश गवळी 44(82,7×4), श्रेयश वाळेकर 30(27,6×4), साहिल चुरी 22(33,2×4,1×6), यश खळदकर नाबाद 13, शुभम हरपाळे 3-31, सिद्धेश वरघंटी 2-41, अजिंक्य गायकवाड 1-6, इझान सय्यद 1-27, यतीन मंगवाणी 1-26);सामनावीर-अजिंक्य गायकवाड; केडन्स क्रिकेट अकादमी 166धावांनी विजयी; व्हेरॉक क्रिकेट अकादमी: 40.2 षटकात सर्वबाद 207धावा(पवन शहा 66(63,8×4,2×6), ओम भोसले 29(42,1×4,1×6), मिझान सय्यद 24(25,5×4), तिलक जाधव 20, रोहित चौधरी 20, कपिल गायकवाड 17, राहुल वारे 16, सचिन भोसले 5-39, वैभव विभुते 4-43, व्यंकटेश दराडे 1-21) पराभूत वि.अँबिशियस क्रिकेट अकादमी: 38.5षटकात 6बाद 208धावा(सचिन भोसले नाबाद 46(45,3×4,3×6), व्यंकटेश दराडे नाबाद 46(54,5×4,1×6), अनिकेत पोरवाल 39(42,6×4), सिद्धांत दोशी 29(21,5×4,1×6), ऋषिकेश बारणे 14, सुरज परदेशी 13, तिलक जाधव 3-19, रोहित चौधरी 2-38, कपिल गायकवाड 1-32);सामनावीर-सचिन भोसले; अँबिशियस क्रिकेट अकादमी 4 गडी राखून विजयी.