~ ब्रँडने महाराष्ट्रातून शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी केली २०० हून अधिक विजेत्यांची घोषणा
पुणे- आरआर ग्लोबल या १.२५ अब्ज अमेरिकन डॉलर मूल्य असलेल्या समूहाचा एक भाग असलेल्या आणि भारतातील आघाडीची वायर आणि केबल उत्पादक कंपनी आरआर काबलने महाराष्ट्रातील केबल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रम विजेत्यांची घोषणा केली. भारतभरातील १०१२ विजेत्यांपैकी पुण्यातील १४२ आणि मुंबईतील १११ विजेत्यांना मुंबईत आरआर काबल कार्यालयात आणि त्यानंतर पुण्यात १९ नोव्हेंबर २०२२ रोजी कार्यक्रमात आयोजित पुरस्कार सोहळ्याद्वारे संबंधित शहरांमध्ये सन्मानित करण्यात आले.
ज्या इलेक्ट्रिशियनच्या मुलांनी या वर्षी त्यांची १० वी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांच्यासाठी केबल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. सक्षम आणि शिक्षित भारतासाठी प्रयत्न करण्याच्या ब्रँडच्या दृष्टीकोनाचा हा एक भाग आहे. आरआर काबल घरातील वायरच्या प्रत्येक बॉक्सच्या विक्रीतून १ रुपयाचे योगदान देते. याच योगदानातून या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत इलेक्ट्रिशियनच्या मुलांच्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी १ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. संपूर्ण भारतातून १,०१२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे आणि त्यांना प्रत्येकी १०,००० रुपये शिष्यवृत्ती मिळत आहे.
या शिष्यवृत्ती कार्यक्रमाबद्दल बोलताना आरआर ग्लोबलच्या संचालिका श्रीमती कीर्ती काबरा म्हणाल्या, “केबल स्टार्स शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या सर्व विजेत्यांचे मी त्यांनी त्यांच्या आयुष्यात हा महत्वाचा टप्पा गाठल्याबद्दल अभिनंदन करू इच्छिते. त्यांच्या उद्दिष्टांच्या दिशेने ते एक पाऊल पुढे टाकत आहेत. आरआर काबल मध्ये आम्ही इलेक्ट्रिशियनना आमच्या समुदायाचा एक अविभाज्य भाग मानतो आणि आमचे उपक्रम या समुदायाच्या कल्याणासाठी योगदान देण्याकरता समर्पित आहेत. केबल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश इलेक्ट्रिशियन बंधुवर्गासाठी व्यवसायाच्या पलीकडे जात काहीतरी करणे हा होता. आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे की या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याचे निकालही अभूतपूर्व लागले आहेत. दहावीच्या परीक्षा कोणत्याही मुलाच्या करिअरमध्ये निर्णायक घटक असतात. त्यांच्या आयुष्यातील हा एक टप्पा असतो जिथे ते त्यांच्या उर्वरित भविष्याचा पाया रचतात आणि आम्हाला या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग व्हायचे होते. हे जाणून घेणे प्रेरणादायी आहे की काही विजेत्यांनी त्यांच्या परीक्षेत ९०% आणि त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. प्रत्येक केबल स्टारने पुढील शिक्षण घ्यावे आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे अशी आमची इच्छा आहे. अशा कार्यक्रमांद्वारे आम्ही आजच्या तरुणांना उद्याचे नेते बनण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करतो.”
आरआर काबलकडून ही शिष्यवृत्ती मिळाल्याने सर्व विजेत्यांना खूप आनंद झाला. त्यांचा प्रवास आणि त्यांच्या योजनांबद्दल जाणून घेणे प्रेरणादायी होते. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे करिअर निवडण्यास मदत करणे हा होता जिथे ते त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू शकतील आणि त्यांच्या भविष्याची मजबूत सुरुवात करू शकतील.