पुणे- उत्तर प्रदेशात आज पिडीत मुलीच्या नातलगांच्या भेटीला निघालेल्या कॉंग्रेसच्या राहुल गांधी यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की चे आणि अटकेचे तीव्र पडसाद येथे उमटले.तातडीने पुणे शहर कॉंग्रेसच्या अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ नेते आबा बागुल,अरविंद शिंदे ,अविनाश बागवे ,अभय छाजेड ,संजय बालगुडे ,संगीता तिवारी आदी मान्यवर कार्यकर्ते यांनी यावेळी तीव्र निदर्शने करीत युपी सरकार आणि पोलिसांचा धिक्कार केला .