पुणे- पुण्यात नागपूर च्या धर्तीवर नॅशनल इन्स्टिटयूट फॉर कॅन्सरची उभारणी करावी अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पुण्यातील भाजपचे जुने जाणते कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे .त्यांनी असे म्हटले आहे कि,’नुकतेच भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे कॅन्सर ह्या दुर्धर आजाराने आपल्याला सोडून गेले. ह्या दोघांची स्मृती चिरकाल जतन करण्यासाठी पुण्यात राष्ट्रीय कॅन्सर अनुसंधान केंद्राची /
( नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कैंसर प्रिवेंशन एंड रिसर्च सेंटर ) ची किंवा नागपूर च्या धर्तीवर नॅशनल इन्स्टिटयूट फॉर कॅन्सर ची उभारणी करावी अशी आग्रही मागणी करत आहे.पुणे शहर, पिंपरी चिंचवड वा जिल्ह्यात कॅन्सर वर अश्या प्रकारच्या संशोधन केंद्राची वा रुग्णालयाची उभारणी ही काळाची गरज असून येथे कॅन्सर वरील रुग्णांना अल्प दरात उपचार मिळाल्यास तीच ह्या दोन्ही मान्यवरांना यथोचित श्रद्धांजली आणि उपयुक्त स्मारक ठरेल असे वाटते.सध्या मोठ्या प्रमाणावर कॅन्सर चे रुग्ण उपचारासाठी वणवण करताना दिसतात आणि विविध शासकीय योजनेतून मिळणारा निधी हा कॅन्सर सारख्या दुर्धर आणि खर्चिक उपचार असणाऱ्या रोगावर अपुरा असल्याचे ही निदर्शनास येते.त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे योग्य विचार करून सकारात्मक निर्णय घ्याल अशी खात्री आहे.असेही खर्डेकर यांनी म्हटले आहे.