बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘रक्तदान शिबिर’ संपन्न
पुणे: कोरोना महामारीच्या काळात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे हिंदूह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विभागप्रमुख राजेश मोरे यांच्यावतीने आयोजित शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला असून शंभरांहून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी खड्ड्यांमुळे त्रस्त पुणेकर रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी पुणे शहर सहसंपर्क अजय भोसले, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, कॅन्टोन्मेंट विभागप्रमुख राजेश मोरे, शहर संघटिका सविताताई मते, युवासेनेचे सनी गवते, युवराज पारिख, उपविधानसभा प्रमुख उत्तम भुजबळ, विभागप्रमुख अनिल दामजी, राजेंद्र शहा, अतुल गोंधकर, शैलेश मोरे, अनिश अनारसे, आदितीसिंग ठाकूर, अर्थव लांडगे उपस्थित होते.