पुणे- नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी शिक्षण समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भाजपा च्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणूनउमेदवारी अर्ज दाखल केला ….यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ,भाजप शहर अध्यक्ष जगदीशजी मुळीक,सभागृह नेते गणेश बिडकर,उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे,ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले व इतर अनेक नगरसेवक उपस्थित होते.दिनांक ५ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजता ही निवडणूक होणार असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थ नेतृत्वाखाली ही निवडणूक नक्कीच जिंकू असा विश्ववास मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केला आहे .