पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती 220 जागा मिळवेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. त्याच वेळी कोथरूडमधून लोकसभेपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून विजय संपादित करेल असेही ते म्हणाले. गुरुवारी सकाळी जोरदार शक्तीप्रदर्शन करत चंद्रकांतदादा यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कोथरुड चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला होणार सुरुवात केली. आज सकाळीच त्यांनी कोथरूडचे ग्रामदैवता म्हातोबाचे दर्शन घेतले.यावेळी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी ,माजी मंत्री शशिकांत सुतार ,खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते. लोकसभेत कोथरूडमधून 1 लाख 6 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. आता त्यापेक्षा जास्त मिळेल असे त्यांनी यावेळी म्हटले आहे .
दरम्यान पर्वती विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार व भाजपा शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी आज पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले,खा.गिरीश बापट,सरचिटणीस दीपक मिसाळ,शिवसेना शहर प्रमुख संदीप मोरे यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी,नगरसेवक,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…