पुणे- पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षांनंतर महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी हि समाचार घेतला आहे. प्रत्यक्षात अजित पवारांनी लोकप्रतिनिधींसमवेत व्पुंयाच्या विधान भवनात बैठक घेतली होती बापट या सभेला उपस्थित नव्हते मात्र त्यांच्या पक्षाचे महापालिकेतील सत्ताधारी महापौर ,सभागृहनेते उपस्थित होते हे सांगताना त्यांनी या बैठकीचे मोबाईल वरील फोटो दाखविले ज्यात शिवसेना आणि मनसे चे गटनेते हि दिसत आहेत आणि या बैठकीला आमदार चंद्रकांतदादा पाटील हि उपस्थित होते . असे असताना लोकप्रतिनिधींसमवेत अजित पवारांनी बैठकच घेतली नाही असे बापट यांनी केलेले विधान खोटे आहे असा दावा शिंदे यांनी केला .त्याच बरोबर भाजप शहराध्यक्ष यांनी घोषित केलेल्या आंदोलना बाबत हि शिंदे यांनी,’ आता यांनी टाळ्या वाजविणे ,थाळ्या वाजविणे, दिवे बंद करून पणत्या लावणे ,आंदोलने करणे अशा पद्धतीच्या शायनिंग बंद करून प्रत्यक्षात जनतेच्या सेवेला महत्व देऊन ते काम सुरु केले पाहिजे असे हि म्हटले आहे . नेमके शिंदे यांनी भाजपच्या या नेत्यांनी आज केलेल्या टीकेचा समाचार कोणत्या शब्दात घेतला तो ऐका त्यंच्याच शब्दात इथे …..