पुणे-विद्यार्थी ,पर्यटक,काही कामानिमित्त पुण्यात आलेले लॉक किंवा मजूर असे जे कोणी कोरोनाच्या लॉक डाऊन मुले पुण्यात अडकून पडलेले नागरिक असतील त्यांना त्यांना शासकीय सर्व परवानग्या रीतसर घेऊन विनामुल्य सर्व सुविधा देऊन आपापल्या घरी पाठवा असे आदेश आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे शहरातील भाजपच्या सर्व १०० नगरसेवकांना दिले . आज सर्व प्रथम भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी आपल्या प्रभागात अडकलेल्या सांगली सात कोल्हापूर कडील विद्यार्थी व तरुण कामगारांसाठी घरी जाण्यासाठी स्वारगेट येथून २ लक्झरी बस सोडल्या . यावेळी आमदार पाटील माध्यमांशी बोलत होते. श्रीनाथ भिमाले,तसेच महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने ,राजेश पांडे ,डॉ. श्रीपाद ढेकणे ,सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर ,पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी ,सतीश काळे,गणेश शेरला आदींच्या उपस्थितीत या बसेस सोडून विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.यावेळी आमचे प्रतिनिधी मयूर आणि अभिषेक लोणकर यांनी केलेला हा व्हिडीओ रिपोर्ट .